भरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी

भरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी कात्रज येथील स्वामी नारायण मंदिराजवळील घटना

पुणे- भरधाव वेगातील कार पलटी झाल्याने कारमधील एक तरुण गंभीर जखमी झाला तर कार चालक बालंबाल बचावला. ही घटना कात्रज येथील स्वामी नारायण मंदीराजवळ रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान कार अपघातामुळे वाहतूकीची काही काळ कोंडी झाली होती. पीएमआरडीच्या अग्निशमन दलाने रस्त्यावर गाडीचे सांडलेले पेट्रो व ऑईलवर मातीचा मारा करुन रस्ता वाहतूकीस खुला केला.
अक्षय दिनकर वणवे(27,रा.नऱ्हे) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. तो आणी त्याच्या महाविद्यालयीन मित्र असे दोघे होंडा सिटी कारमधून नऱ्हेच्या दिशेने कात्रच्या नव्या बोगद्याकडून चालले होते.

अीयचा मित्र गाडी चालवत होता. त्यांची गाडी स्वामी नारायण मंदिराजवळील सर्व्हिस रस्त्यावर आल्यावर त्यांच्या कारसमोर अचानक एक दुचाकी आली. तीला चुकविण्याच्या नादात चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कार तीन ते चार वेळा कोलांटी उड्या घेऊन रस्त्याच्या कडेला आदळली. यामध्ये कारचा पुर्णपर्ण चेंदामेंदा झाला. यात चालकाला किरकोळ जखम झाली, मात्र त्याच्या शेजारी असलेल्या अक्षयला गंभीर मार लागला. त्याला बेशुध्दावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांनी दिली.

दरम्यान कारच्या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणी ऑईल सांडल्याने त्यावरुन वाहने घसरत होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यांनी तातडीने रस्त्यावर माती टाकून रस्ता खुला केला. अग्निशमन दलाचे ओंकार इंगवले, पंकज माळी, महेश पाटील, महेंद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.