हडपसर(प्रतिनिधी) – ससाणेनगर व रवी पार्क जवळ भुयारी मार्ग आहेत. परंतु महंमदवाडी, हांडेवाडी, सय्यदनगर आणि ससाणेनगर येथील वाहतूक कोंडी पूर्णपणे सोडवण्यासाठी सय्यदनगर येथे रेल्वेगेटवर भुयारी मार्ग काढल्यास येथील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होईल. परंतु, त्यासाठी आवश्यक रस्त्यांच्या भूसंपादनाचा तसेच त्यात बाधित होणाऱ्या मिळकत धारकांचा खर्च अधिक असल्याने बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी भूसंपादन व बाधित होणाऱ्या मिळकती साठी सुमारे 50 कोटींचा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे म्हणाले की, महापालिकेने मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी असलेली अभय योजना बंद केली आहे. ती पुन्हा सुरू करण्यात यावी, तसेच शहर व उपनगरात असलेले जुनेवाडे यांचे विकसन करताना पंधरा मीटर पेक्षा उंच इमारतीसाठी 1 मीटर सामायिक जागा सोडणे आता शक्य नाही. त्यामुळे जुने वाड्यासाठी असलेले नियम काही प्रमाणात स्थितील करावेत जेणेकरून अनेकांना त्याचा उपयोग होईल.
याशिवाय महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 34 गावांच्या मिळकतीचे कर कमी करावेत, यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पीएमपीएमलच्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के सातवा वेतन आयोग दिला आहे. उर्वरीत पन्नास टक्के लवकरात लवकर मिळावा. तसेच महापालिकेतील कंत्राटी कामगार यांना कायम करून घ्यावे, गुंठेवारी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, ससूनच्या धर्तीवर अजून एक रुग्णालय उभारण्यात यावे, शहराला व सर्व उपनगरांना समान पाणी पुरवठा करावा, असा स्वरूपाच्या मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केल्या आहेत.
एम.फील.अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक – मंत्री चंद्रकांत पाटील
अनेक मागण्या मान्य होत असून उर्वरित कामासाठी त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी सांगितले.