पुणे – येरवडा कारागृहासमोर शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने पेट घेतला. अग्निशमन दलाने ही आग शांत केली. यात कोणीही जखमी नाही. पण, वाहन मात्र पूर्ण जळून खाक झाले.
येरवडा कारागृहसमोर हा प्रकार झाल्याने पोलिससह सुरक्षा यंत्रणाची तारांबळ उडाली. शाॅर्टसर्किटमुळे गाडीला आग लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात तीन व्यक्ती होत्या. आग लागल्याचे त्यांच्या लक्षात येताच ते गाडीबाहेर आले. या आगीत चारचाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. हा रस्ता वर्दळीचा असल्याने बघ्याची गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले.