पुणे – भारतीय डाक विभागातर्फे जिल्हास्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. बालगंधर्व कलादालनात दि. ६ व ७ डिसेंबर रोजी हे हे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनामुळे “फिलाटेली” चा (टपाल तिकिटांचा संग्रह) छंद जोपासण्याची तसेच प्रदर्शन बघण्याची सुवर्ण संधी पुणेकरांना विशेषतः लहान मुलांना मिळणार आहे.
प्रदर्शनस्थळी विविध “फिलाटेली” चे तिकीट विक्रीसाठी उपलब्ध राहतील तसेच “माय स्टॅम्प” योजने अंतर्गत स्वतःचे फोटो असलेले टपाल तिकीट तयार करून घेण्याची विशेष व्यवस्था प्रदर्शनस्थळी उपलब्ध करण्यात येणार आहे. पुणेकरांनी तसेच विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन आर. के. जायभाये, पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे यांनी केले आहे.