पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 4 मार्चपासून इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 3 मार्चपर्यंत सुविधा उपलब्ध राहणार आहे.
बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 7 एप्रिलपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहेत. विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारु नये व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. 3 मार्चनंतर संकेतस्थळ बंद करण्यात येणार असल्याने अर्ज भरता येणार नाहीत. मुदती अर्ज भण्यात यावेत.
याबाबतची सर्व मुख्याध्यापाक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, पालक व इतर संबंधित घटक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.