पुणे :स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी व पारंपरिक भारतीय कलेशी निवडीत चित्र व शिल्पांचे प्रदर्शन आहे. पीएनजी सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत भरविण्यात येणारे एथिनिक हूज प्रदर्शनात महाराष्ट्रातील चाळीसहून अधिक कलाकार सहभागी होत आहेत. प्रदर्शन दोन टप्प्यात ८ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत होईल.
आदिवासी कला व भारतीय पारंपरिक शिल्प व चित्रकलेचा संगम असणारे प्रदर्शन पहिल्यांदाच होत आहे. यात वारली, गोंद, सुरा, संथाला, सिंधू संस्कृती, तिंगा तिंगा, अब्रोजिनल या मूळ भारतीय व परदेशी आदिवासी कला त्याचबरोबर पारंपरिक भारतीय कला मधुबनी, कलमकारी, पत्तचित्र, चित्रकथी, लघुचित्र, पिछवाई, फाट, केरळ शिल्प, चेरियल आदींचा समावेश आहे.
कोथरूड हॅपी कॉलनीतील पीएनजी सन्सच्या शोरूमध्ये एथिनिक हूज प्रदर्शन ८ ते १३ ऑगस्टपर्यंत तर औंध वेस्टंड सेंटर वनमधील पीएनजी सन्सच्या शोरूमच्या कलादालनात ८ ते २० ऑगस्ट २०२३ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी आठ पर्यंत खुले राहील. भारताला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतीय कला एकाच ठिकाणी लोकांना पाहता याव्यात या हेतूने प्रदर्शनाचे आयोजन होत आहे.