पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त कोरेगाव पार्क पुणे येथील अंध-अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. लोकसेवा प्रतिष्ठान अखिल मंगळवार पेठेचे संस्थापक अध्यक्ष विजय वारभुवन आणि छाया विजय वारभुवन यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी रिपब्लिकन संघर्ष दलाचे प्रदेशध्यक्ष संजय भिमाले, भारतीय बौद्ध महासभा मंगळवार पेठ शाखेचे अध्यक्ष नितीन वाघमारे, भीम छावा संघटनेचे अध्यक्ष शामभाऊ गायकवाड उपस्थित होते. स्मिता कडाळे, प्रज्ञा शिंदे, कल्पना आवाड, चैताली वाघमारे, प्रतिष्ठानचे सचिन वाघमारे, अजय कडाळे चाबुकस्वार मुकुंद, राजू शिंदे, अनिल आवाड, कृष्णा साबळे, प्रमोद साळवे, सिद्धेश वारभुवन, एकलव्य साबळे, यश वारभुवन यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.