रेडा- इंदापूर तालुक्यातील सराफवाडी गावच्या हद्दीत असणारा पुरातन वाघाळे तलाव दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार ही माहिती आमदार रोहित पवार यांना कळवली. शेतकऱ्यांची नस ओळखून तलावाचे काम करण्यासाठी मशीन, खोदाईसाठी निधी उपलब्ध करून दिला.
त्यामुळे वाघाळा तलावाचे काम करता आले, अशी माहिती बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी दिली. सराफवाडी (ता. इंदापूर) येथील वाघाळा तलावाचे जलपूजन पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी इंदापूर बाजार समितीचे माजी संचालक किरण बोरा, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, सराफवाडीचे सरपंच सुखदेव बाबर, तंटामुक्तीचे अध्यक्ष संदीप माने, विष्णू सूर्यवंशी, दत्तात्रेय बाबर, शब्बीर शेख, चांगदेव सूर्यवंशी, निलेश जाधव, भीमराव लोंढे, हनुमंत लांवड, लव्हू भापकर, राजू बावकर, ग्रामसेवक सचिन पवार, दादाराम जाधव, ग्रामस्थ उपस्थित होते.
पवार म्हणाल्या की, सराफवाडी गावात पहिल्यांदा तीन वर्षांपूर्वी आले होते. या गावात पाणीप्रश्न होता. तलावावर पाच गावांचा पिण्याचे पाणी अवलंबून होते. रोहित पवार यांनी मदत केली. जवळपास 25 गावांमध्ये कोट्यवधी लिटर पाणी साठवता आले आहे. ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने हे काम पूर्ण झाले. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये सराफवाडी गावाने दुसरा क्रमांक मिळवला आहे, याचा मला अभिमान वाटतो, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापुराव जाधव यांनी केले.