मंचर – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे चंपाषष्टीनिमित्त श्री खंडोबा महाराज मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापना पाचवा वर्धापन दिन सोमवारी (दि. १८) उत्साहात साजरा करण्यात आला.
चंपाषष्टीनिमित्त श्री खंडोबा महाराज मंदिरात भाविक भक्तांनी तळीभंडार केला. सकाळी सात ते आठ वाजता श्रीचे मूर्तीचे अभिषेक करून, नऊ ते बारा या वेळेत जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी सुमारे दीड हजार भाविकांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला. अन्नप्रसादाचे अन्नदाते भिवाजी शिंदे आणि लाडूचा प्रसाद शिवतेज शिंदे यांनी केला.
आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष भोर, भीमाशंकर कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे, आनंदराव भोर पाटील, देविदास क्षीरसागर, सावळेराम टेमकर, वामन शिंदे, नवनाथ शिंदे आदी ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.