पिरंगुट – शिवसेना जिल्हाप्रमुख व मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सुसचे माजी सरपंच नारायण चांदेरे यांनी दिली.
वाढदिवसानिमित्त पंधरा ते वीस जानेवारी या दरम्यान लहान मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना व नागरिकांसाठी मोफत आधारकार्ड अभियान पार पडले. आज मंगळवारी पौड येथील पंचायत समितीच्या सभागृहात अपंग मेळावा व साहित्याचे वाटप करण्यात आले.
गुरुवारी आळंदे (ता. भोर) येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होणार आहेत. तर शुक्रवारी सूस (ता. मुळशी) येथे महिलांसाठी खेळ पैठणीचा हा होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी गडले (ता. मुळशी) येथील लवासा भागात क्रिकेट स्पर्धा होणार असून रविवारी हिंजवडी येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 30) चाले येथील मुगावडे फाट्यावर मुळशी केसरी बैलगाडा शर्यतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.