मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात तीन लाखांची मानकरी
आळेफाटा – वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हाअध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच जुन्नर तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकन वडगाव आनंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत तीन लाख रकमेचेे मानकरी ठरली असून शाळेची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
या शाळेत 2011 वर्षांपासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले. या शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शाळेचा अधिकाधिक विकास सीएसआर निधीतून झाला आहे. प्रशस्त क्रीडांगण, सुसज्ज इमारत, स्वतंत्र संगणक कक्ष, पिण्याचे आरओ पाणी, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वतंत्र भोजनालय, दप्तर ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकर सुविधा,
सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली प्रशस्त परसबाग, चिल्ड्रेन बचत बँक, बालसंसद, गांडूळ खत प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बहरलेली आमराई, शालेय बाग, भरपूर क्रीडा साहित्य, अध्यापनासाठी प्रत्येक वर्गात स्वतंत्र ई लर्निंग सुविधा, इंटर अॅक्टिव्ह बोर्ड, बोलका व्हरांडा व संरक्षक भिंत, प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे, जॉगिंग ट्रॅक अशा भौतिक सुविधा आहेत.
शालेय गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तत्कालीन गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे व शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ डी. बी. वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, सहशिक्षिका वृषाली कालेकर, संगीता कुदळे, मनीषा इले, गौरी डुंबरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश चौगुले, उपाध्यक्ष संदेश काशिकेदार, सदस्य सतीश भिंगारदिवे, सचिन देवकर, वैशाली देवकर, जया देवकर, रेश्मा कुटे, वृषाली चौगुले आदींसह ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.