पुणे जिल्हा: करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी

आरोग्य यंत्रणा सज्ज

राजगुरूनगर -करोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. संशयित करोनाबाधित रुग्ण सापडल्यास संपर्कात आलेल्या दहा लोकांमागे 140 चाचण्या करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली. 

राजगुरुनगर येथे आनंदी आनंद मंगल कार्यालयात तालुकास्तरावर डॉक्‍टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोविड संदर्भात उपाययोजनाचा आणि विविध आरोग्याविषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. करोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हाभर तालुकास्तरीय बैठका घेऊन आरोग्य यंत्रणांना सावध करण्यात येत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयित रुग्ण, बाधित रुग्ण यांच्या संपर्कातील किमान दहा जणांचा शोध घेऊन पुन्हा दहा लोकांच्या संपर्कात आलेल्या अशा 140 जणांच्या चाचण्या घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र हे सातही दिवस 24 तास सुरु असलेच पाहिजे. मात्र याबाबत तक्रारी येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत विविध प्रकारच्या तक्रारी येत आहेत. वेळीच याबाबत जिल्हास्तरावर तक्रारीची दखल घेऊन समज देऊनही पुन्हा तक्रारी येण्यापेक्षा आपल्या दिलेल्या वेळेत आपण आपल्या कर्तव्यावर जाणार नसाल तर याची यापुढे योग्य प्रकारे दखल घेतली जाईल.

आलेल्या तक्रारीबाबत गय करणार नसल्याचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार दिला. खेड तालुक्‍यात दहा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत 47 समुदाय वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासस्थानी समुदाय वैद्यकीय अधिकारी यांनी राहून नागरिकांना सेवा वेळेवर देण्याच्या सूचना डॉ. भगवान पवार यांनी दिल्या.

आरोग्य केंद्रांत 401 समुदाय वैद्यकीय अधिकारी
जिल्ह्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय डॉक्‍टराबरोबरच 539 आरोग्य वर्धिनी, 401 समुदाय वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील, गावातील जनतेला 13 महत्त्वाच्या आरोग्य सेवेबरोबरच घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षणातून आजारी व्यक्तीचा शोध घेता येईल. असंसर्गजन्य आजारांवर वेळीच उपचार आणि गरोदर माता आणि बालकांचे आजार आणि लसीकरण मोहिम संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येत आहे.

क्षयरोग, कुष्ठरोग रुग्णांची शोधमोहीम
जिल्ह्यात सर्वत्र संयुक्तपणे क्षयरोग, कुष्ठरोग रुग्णांची शोधमोहिम आरोग्य यत्रंणेमार्फत सुरु करण्यात आली असून, आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन याची शोधमोहीम 1 ते 16 डिसेंबर सुरू राहणार आहे. य रुग्णाचे नाव गुप्त ठेवले जाईल. तरी क्षयबाधा, कुष्ठरुग्ण नागरिकांनी आजार न लपविता आरोग्य यंत्रणेला सहकार्य सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.