हरियाणातील रोड मराठा बांधवांची भोरमध्ये मागणी
भोर – महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आमचा पाठिंबा असून, देशातील अनेक राज्यांत मराठा समाज बांधव आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर हरियाणासह इतर राज्यांतील मराठा समाजाला आरक्षण मिळेल, त्यामुळे मराठा आंदोलनाची चळवळ देशव्यापी झाली पहिजे, अशी मागणी हरियाणातील रोड मराठा बांधवांनी भोरमध्ये केली आहे.
हरियाणा पानिपत येथील १४ जानेवारी रोजी होणा-या रोड मराठा बांधव पानिपत युद्ध शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी हरियाणातून हे पथक भोरमध्ये आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत वरील मागणी करण्यात आली.
यावेळी हरियाणा येथील रोड मराठा केशमसिंग तोराण, प्रवीण घरताल, करंबवीर मेहले, सुरजित चौधरी, बाला चौधरी यांसह महेश शेटे, भालचंद्र मळेकर, दीपक शेटे, सोमनाथ ढवळे, गणेश पवार, राजेश महांगरे, शुभम शेटे, राजकुमार खरमरे, संजय गोळे, उत्तम शिंदे, नीलेश खरमरे उपस्थित होते.
यावेळी हरियाणा पानिपत रोड मराठा बांधवांनी शेटेवाडी चौपाटी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण कररून अभिवादन केले. बस्ताडा जिल्हा कर्नाल हरियाणा येथे १४ जानेवारी २०२४ ला पनिपत शौर्य दिन मराठा जागृती मंच पानिपतचे संस्थापक विरेंद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र, उत्तरांचल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, राजस्थान येथील मराठा बांधव सहभागी होणार असून त्यांचा कार्यक्रमात गौरव केला जाणार आहे.
त्यानंतर छञपती शिवाजीमहाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर पानिपत येथील मराठा युध्द भूमीचे दर्शन घेऊन आलेल्या सर्वासाठी मेजवानीची व्यवस्था करण्यात येणार आली आहे. हरियानातील रोड मराठा समाजाला महिती देऊन जागृती करण्याचे काम केशव मौर्य, विरेंद्र वर्मा आणि नीलेश पाटील यांनी केले असून, १७६१ युध्दानंतर सुमारे ४५० वर्षानंतर हरियाणासह देशातील सर्व मराठा बांधव एकत्र करण्याचे काम सुरू आहे.
…तर केंद्र सरकार मराठ्यांना आरक्षण देईल
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची चळवळ मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मात्र याच विषयाच्या अनुषांगाने जरांगे पाटील यांनी २० जानेवारी पासून उपोषणाचा इशारा दिला असून, या आंदोलनाला हरियाना पानिपत येथील मराठा बांधवांचा पाठिंबा असून यावेळी आम्ही उपस्थित राहणार आहोत. ही आरक्षणाची चळवळ देशव्यापी झाल्यास भारत सरकारला मराठ्यांना आरक्षण देणे अरिहार्य ठरेल असा विश्वास केशमसिंग तोराणा यांनी व्यक्त केला.