पुणे – शहरातील किमान तापमान दहा अंशांपर्यंत घसरल्यामुळे पाषाण, एनडीए, हवेलीच्या काही भागात हुडहुडी भरणऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. तर शहरातही थंडी जाणवत असून, ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. मंगळवारी (दि. 26) शहरातील किमान तापमान 12अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
मागील आठ दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील थंडीचा जोर वाढलेला आहे. काही भागात किमान तापमान 10 अंशाच्या खाली गेले असून, डोंगर भाग आणि धरणक्षेत्रात हुडहुडी भरणारी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहे. त्यामुळे पहाटे तर काही भागात रात्री धुके पडत आहे. शहरात पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, आकाश निरभ्र राहील. तर दि. 29 डिसेंबरनंतर अधून-मधून आकाश ढगाळ राहील. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील 24 तासातील काही प्रमुख भागातील किमान तापमान
पाषण, एनडीए आणि हवेली 11, शिवाजीनगर, 12.3, नारायणगाव 13.2, आंबेगाव 13.6, तळेगाव 13.8, कोरेगाव पार्क 16, मगरपट्टा 17, लोणावळा 19