इंदापूर – शिवप्रेमी व इंदापूरकर यांची गढी व दर्गाह विकास आराखड्याची असणाऱ्या मागणीला माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्यापासून केलेल्या सरकार दरबारातील पाठपुराव्यामुळेच वीरश्री मालोजीराजे भोसले गढी व चांदशहावलीबाबा दर्गाह संवर्धनासाठी निधी मंजूर झाला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीमध्ये सामील होण्याच्या अगोदर पासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या पाठपुरामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. तालुका प्रतिनिधींनी हे क्रेडिट घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करू नये, असा टोला भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चांदशहावलीबाबा दर्गाह विकास आराखड्यास महायुती सरकारने निधी मंजूर केला आहे. इंदापूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी नगरसेवक गोरख शिंदे, सुनील आरगडे, रोहित पाटील, अमोलराजे इंगळे, दत्ता पांढरे, महादेव पांढरे, तुषार खराडे, प्रशांत गलांडे, शिवप्रेमी उपस्थित होते.