अध्यक्षपदी संजय ढमढेरे : तिघांची उपाध्यक्षपदी निवड
तळेगाव ढमढेरे – येथील माजी तंटामुक्ती रमेश भुजबळ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अनेक वर्षापासून तंटामुक्ती समिती निवडीत तंटा होत असल्याने अनेक वर्ष हे पद रिक्त होते.
अखेर इच्छुक उमेदवारांनी एकमत करून पंधरा वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गावाला तंटामुक्ती समिती पुन्हा एखादा सक्रिय करण्यास गावकऱ्यांना यश आले. संजय ढमढेरे यांची अध्यक्षपदी तर शंकर भुजबळ, दीपक ढमढेरे, किशोर रासकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामसभा सरपंच अंकिता भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संपूर्ण ग्रामसभेचे लक्ष लागून असलेल्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदासाठी आठ इच्छुक उमेदवार होते यामध्ये संपत भुजबळ, संजय ढमढेरे, बापूसाहेब भुजबळ, सुधीर ढमढेरे, मयुर भुजबळ, दीपक ढमढेरे, शंकर भुजबळ, किशोर रासकर आदींनी तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी अर्ज केले होते.
यावेळी घोडगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ, माजी उपसभापती अनिल भुजबळ, शिरूर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विश्वास ढमढेरे, माजी सभापती आरती भुजबळ, घोडगंगा माजी संचालक सुधीर ढमढेरे यांसह ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.