सुदामराव इंगळे : सासवड येथे ज्येष्ठांची मोफत तपासणी शिबिर
दिव्यागांनी योजने अंतर्गत कृत्रिम अवयव व साधनांचे वाटप
सासवड – खासदार सुप्रिया सुळे या केंद्र शासनाच्या योजना तळागाळातील गरिबांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे लोकसभेत देखील त्यांना सन्मानित केले जाते. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व भागांमध्ये वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात खासदार सुळे यांच्यामुळे मिळत आहे, ही केंद्र शासनाची योजना तळागाळापर्यंत यशस्वीपणे पोहोचविण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून वयोश्री योजने अंतर्गत 60 वर्षांच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत आणि दिव्यागांसाठी योजने अंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने यांचे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सुदामराव इंगळे बोलत होते.
यावेळी आनंदीकाकी जगताप, सुदाम इंगळे, मार्तंड भोंडे, दत्ता झुरंगे, योगेश फडतरे, खासदार सुळे यांचे स्वीय सहायक मयूर जगताप, निता सुभागडे, वामन जगताप, सुनिता कोलते, प्रकश कड, माऊली यादव, पुष्कराज जाधव, विठ्ठल मोकाशी, गटविकास विकास अधिकारी अमर माने, सागर जगताप काळदरीचे सरपंच गणेशकाका जगताप, ईश्वर बागमार शेखर बडदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडुकाका जगताप यांनी, प्रास्ताविक पुरंदर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण यांनी तर कलाताई फरतडे यांनी आभार मानले.