बारामती – सुसंस्कृत समाजाच्या जडणघडणीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे, त्यामुळे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा जाणीव प्रतिष्ठानचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन अभिनेते संजय खापरे यांनी केले.
येथील जाणीव प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीला वंदन करण्यासाठी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा जाणीव नवदुर्गा पुरस्कार देऊन अभिनेते खापरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी खास महिलांसाठी डोन्ट वरी हो जाएगा या नाट्यप्रयोगाच्या आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या संदर्भातल्या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या या नाट्यप्रयोगाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी संजय खापरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी अर्चना रवींद्र काळे, हेमलता सुरेश परकाळे, सोनाली विकास जगताप, ज्योती हनुमंत गाडे, प्रतिभा सत्यवान जगताप उपस्थित होत्या. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती आरास स्पर्धेत क्रमांक मिळवल्याबद्दल रूपाली धैर्यशील पैठणकर (माळेगाव बुद्रुक), सोनम प्रसाद गाडे (बारामती), आरती सचिन मोकाशी (माळेगाव खुर्द), आरती वाबळे (माळेगाव बुद्रुक) यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सृष्टी मोरे, तेजस भोसले, ऍड किशोर मोरे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन कुमार देवकाते यांनी केले. प्रतिष्ठानच्या विश्वस्त वंदना भोसले यांनी आभार मानले.
पुरस्काराचे मानकरी
विमल जाधव (वॉटर स्टेशन), स्नेहलता जगताप (पणदरे), मनीषा कामथे (पुरंदर), माधुरी क्षीरसागर (बारामती), वनिता तावरे (पाहुणेवाडी), संयुक्ता तावरे (सांगवी), रोहिणी आटोळे (डोर्लेवाडी), मंगल नाळे (सरपंच, कऱ्हावागज), रजनीगंधा रसाळ (देऊळगाव रसाळ), सलोनी सरडे (बारामती).