मंचर – मराठा कुणबी समाजाच्या आरक्षणा संदर्भात काढलेल्या अधिसूचनेवर हरकती घेण्यासाठी ओबीसी समाजासह सर्वच समाज बाधवाना विविध अडचणींनी सामोरे जावे लागत आहे. यासाठी राज्यातील सर्व तहसील कार्यालयात हरकती घेण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करावी. या मागणीचे निवेदन सोमवारी (दि. 5) आंबेगाव तालुक्यातील सर्व बारा बलुतेदार व ओबीसी संघटनेच्या वतीने घोडेगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अनंता गवारी यांना देण्यात आले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडेकर, शरद बँकेच्या संचालिका रुपाली झोडगे, बँक समता परिषद आंबेगाव किरण घोडेकर, ग्रामपंचायत सदस्या जागृती महाजन, मंचरच्या माजी सरपंच प्रमिला निराळी, अनुसया नागरी पतसंस्थाच्या संचालिका ज्योती घोडेकर, शिंपी समाजाचे अध्यक्ष संजय नांगरे, युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात, प्रवीण डोके, सुनील झोडगे, विनोद आणा कासार, सोनाली काळे, दिनेश दहितुले,, जगदीश अभंग, श्रीकांत सोमवंशी, स्वन्पील भास्कर, उषा डावखरे,, अंजली जंगम, खंडू घोडेकर, अशोक डोके, संतोष भागवत, अंजली जंगम, नीलिमा पांढरे, किरण महाजन, उपस्थित होते.
मराठा समाजाच्या आंदोलना नंतर राज्य सरकारने अधिसूचना काढत मराठा कुणबी आरक्षण देण्यासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत. यासाठी 30 रुपये खर्च येतो. खूप मोठ्या प्रमाणावर वाड्या वस्त्यांवर राहणार्या गरीब ओबीसी समाजाला प्रत्येक हरकतीला हा खर्च करणे अवघड झाले आहे.
आरक्षणावर आपापली हरकती/सूचना जास्तीत जास्त येण्यासाठी तालुका स्थरावर तहसील कार्यालयात हरकती स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कशा असावा अशी मागणी लेखी निवेदनात ओबीसी बांधव यांनी यावेळी सर्व 12 बलुतेदार समाजाचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या
यावेळी किरण घोडेकर, रूपाली झोडगे, संजय जंगम, प्रवीण डोके, मिथुन पांचाळ, ज्योती घोडेकर यांनी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास पूर्णपणे नकार देत मराठा समाजाकरिता स्वतंत्र आरक्षणाची व्यवस्था करण्याची मागणीही केली.