श्री जननी देवी व श्री काळभैरवनाथ या बहीण भावाच्या पालख्यांची गळाभेट
वीसगाव खोरे – धावडी (ता. भोर) येथील ग्रामदैवत श्री जननी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. कुस्ती आखाड्यात पै.शुभम शेटे याने अण्णा बिरामणे याला चितपट करत श्री जननी देवी केसरीचा किताब मिळवला.
यात्रेनिमित्त मंगळवार (दि. १९) रोजी पहाटे देवीचा महाभिषेक, महा आरती दुपारी ४ वाजता पालखी मिरवणूक वनभोजन कार्यक्रम पार पडला. रात्री श्री जननी देवी श्री काळभैरवनाथ या दोन्ही बहीण भावाच्या पालख्यांची गळाभेट होऊन छबिना सोहळा संपन्न झाला. यावेळी भव्य ढोल लेझीम खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वीस संघ सहभागी झाले असताना यामध्ये प्रथम क्रमांक – पिलाणेवाडी (५ हजार) द्वितीय क्रमांक – बाजारवाडी (४ हजार), तृतीय क्रमांक- नांदघुर (३ हजार) या संघाने विजय मिळवला असून ढाल व गावचा इनाम देण्यात आला .
बुधवार (दि.२०) रोजी सकाळी ११ वाजता महादेव मानवकर यांचा लोकनाट्य तमाशानंतर दुपारी भव्य अशा कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात आला होता. यामध्ये शुभम शेटे विरुद्ध अण्णा बिरामणे यांच्यात अटीतटीची लढत होऊन शुभम शेटे विजेता ठरला. त्याला सरपंच विलास राऊत यांच्या वतीने चांदीची गदा व रोख रक्कम देण्यात आली. इकलास शेख विरुद्ध रोहित सावंत यांच्यात लढत झाली. यामध्ये शेख विजेता ठरला असून अमित राऊत यांच्याकडून रोख इनाम देण्यात आले.
अभिषेक जाधव व शिवराज खोपडे यांच्यात समान लढत झाली. यांना नामदेव चव्हाण व विकास चव्हाण यांच्या वतीने रोख रक्कम देण्यात आली. अथर्व शेटे विरुद्ध सार्थक दानवले यांच्यात लढत झाली असून शेटे विजेता ठरला. त्याला रमेश राऊत यांच्याकडून बक्षीस देण्यात आले. ओमकार निगडे विरुद्ध विशाल काळे यांच्यात समान लढत झाली असून गणेश राऊत यांच्याकडून इनाम देण्यात आला.
दीडशे कुस्ती-मल्लानी आखाड्यात सहभाग घेतला होता. कुस्त्यांचा जगी आखाडा पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. पंच म्हणून दिलीप गोळे, सुनील राऊत, बंडू चव्हाण, रामचंद्र राऊत, विकी चव्हाण, विलास राऊत, ज्ञानेश्वर राऊत, सुरेश राऊत, विष्णू राऊत, संजय गोळे, प्रकाश चव्हाण यांनी काम पहिले.
अमित दरेकर, मंगेश दरेकर, राहुल दरेकर, सागर चव्हाण, तेजस चव्हाण, अमित गोळे, प्रथमेश गोळे, शुभम गोळे, रवी चव्हाण, मंगेश राऊत, नवनाथ राऊत, अजय गोळे, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. रामा गोळे व अनिल राऊत समलोचक म्हणून काम पाहिले.