दामूअण्णा घोडे यांच्याकडे एकहाती सत्ता
शिरूर/ सविंदणे – राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शिरुर तालुक्यात प्रथमच निवडणूक झाली आहे. यात माजी आमदार पोपटराव गावडे यांना धक्का बसला आहे. माजी सरपंच दामूअण्णा घोडे यांचे पॅनल विजयी झाले. शिरूर तालुक्याचे दोनवेळा प्रतिनिधीत्व केलेले माजी आमदार गावडे यांच्या बेट भागातील वर्चस्वाला ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने जबर हादरा बसला. टाकळी हाजी या मुख्य गावाबरोबरच म्हसे बुद्रूक व माळवाडी या विभक्त झालेल्या ग्रामपंचायतींत गावडे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी, माजी सरपंच दामूअण्णा घोडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत शिवसेना, भाजप व इतर विरोधकांच्या मदतीने सत्ता स्थापन केली.
निवडणूक जाहीर झाल्यापासूनच बेट भागात व विशेषतः टाकळी हाजीमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली होती. माजी आमदार गावडे व माजी सरपंच घोडे हे दोघेही राष्ट्रवादीचे असल्याने थेट माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही दोघांत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोन्ही बाजूंच्या ताठर भूमिकेमुळे अखेर निवडणूक लागली. गावडे यांच्यासह त्यांचे चिरंजीव घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, सूनबाई जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे, नातू टाकळीचे माजी सरपंच अजित गावडे यांनी तडाखेबंद यंत्रणा उभी केली होती.
माजी सरपंच घोडे यांनी पत्नी, पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, भाजप किसान आघाडीचे तालुका सरचिटणीस सावित्राशेठ थोरात यांच्या मदतीने विरोधकांची मजबूत फळी उभी केली. गावडे-घोडे हे एकमेकांचे नातेवाईकच असल्याने अवघ्या बेट भागात सगेसोयरेच एकमेकांविरोधात उभे ठाकले होते.
टाकळी हाजी ग्रामपंचायतीमध्ये गावडे यांच्या नेतृत्वाखालील मळगंगा परिवर्तन पॅनलविरूद्ध माजी सरपंच दामूअण्णा घोडे यांच्या नेतृत्वाखालील मळगंगा ग्रामविकास पॅनलमध्ये चुरशीने निवडणूक झाली. एकूण 17 जागांपैकी 16 जागा मिळवून घोडे यांच्या
टाकळी हाजीतील विजयी उमेदवार
वॉर्ड 1 : अशोक गावडे, पारूबाई माळी, अरूणा घोडे, वॉर्ड 2 : गोविंद गावडे, अनिता जाधव, मनीषा घोडे, वॉर्ड 3 : नानासाहेब साबळे, विलास साबळे, प्रियांका बारहाते, वॉर्ड 4 : दामूशेठ घोडे, अरूणा कांदळकर, पुष्पाबाई थोरात, वॉर्ड 5 :अर्जुन खामकर, भरत खामकर, प्रियांका दिवेकर, वॉर्ड 6 : मोहन चोरे, प्रमिला चोरे.