इंदापूर – बेलवाडी (ता. इंदापूर) येथील शहाजी धोंडिबा शिंदे यांचा महाराष्ट्र राज्य डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडी बद्दल माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे मंगळवारी (दि.19) सत्कार करण्यात आला.
शहाजी शिंदे हे दूधगंगा सहकारी दूध संघ इंदापूरचे माजी अध्यक्ष आहेत. डेअरी असोसिएशनच्या पुणे येथे मंगळवारी (दि. 12) झालेल्या बैठकीत शहाजीराव शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शिंदे यांच्या आजपर्यंतच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे दुग्ध व्यवसायास होईल, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अॅड. शरद जामदार, सहकार महर्षी शंकरराव मोहित पाटील, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश मेहेर, विजय पवार, संजय पवार, अरविंद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.