राम नामस्मरणात दंग होऊन भाविक भक्तीरसात चिंब
वीसगाव खोरे – भोर तालुक्यातील वीसगाव खोरे, हिरडस मावळ खो-यातील ग्रामीण भागात राम नामाच्या गजरात व टाळ मृदंगाच्या तालावर रामभक्त आनंद घेत राम नामस्मरणात दंग होत भक्तीरसात चिंब झाले.
प्रभू रामचंद्रांची प्रतिमा पालखीतून तर काही ठिकाणी बैलगाडीतून ग्रामदेवताच्या भेटीस ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करीत फटाक्यांच्या आतीशबाजी करत प्रभू रामचंद्र की जय या जयघोषात नेत ग्रामप्रदिक्षणा भक्तीमय वातावरणात पार पडत होते.
टाळमृदगांच्या तालावर विद्यार्थी पालक फेर धरून रामनाम स्मरणात तल्लीन झाले होते. दिंडीची ग्रामप्रदिक्षणा करताना ठिकठिकाणी महिला ग्रामस्थांनी भक्ती भावाने स्वागत केले.
विद्यार्थ्यांनी प्रभू रामचंद्रांचा पोषाख परिधान करून विठ्ठल- रखुमाई, ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा एकनाथ, जनाबाई, मीराबाई अशा अनेक व्यक्तिरेखा साकारून व मुलींनी तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन पालखी सोहळ्यात विद्यार्थी रामनामाच्या जयघोषात तल्लीन झाले होते.
गावातील घरासमोर, रस्त्याच्या कडेला रांगोळी, भगवा ध्वज उभारला होता. नाझरे गावात 51 फुटी गुडी उभारली होती. गावातील राममंदिरात अभिषेक, होमहवन आरती महाप्रसाद आयोजन केले होते.