शिरूरसह पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांतील पहिली लॅब
पाबळ – बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लॅबचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. हे रोबोटिक्स लॅब शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे. बालाजी शिक्षण संस्था ही नेहमीच शाळेत दर्जेदार शिक्षण देत नावीन्यता जपली आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे कॉम्प्युटर सिस्टीम जटिल कार्य करण्यास सक्षम आहेत. जी ऐतिहासिकदृष्ट्या केवळ एक माणूस करू शकतो. जसे की, तर्क करणे, निर्णय घेणे किंवा समस्या सोडवणे, कोडींगमध्ये संगणकांना कसे कार्य करावे आणि कोणत्या कृती कराव्यात, याची सूचना देणे तसेच रोबोटिक्स हे असे आंतरविद्याशाखीय क्षेत्र आहे. ज्यामध्ये रोबोटची रचना, ऑपरेशन व वापर यांचा समावेश आहे.
सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श माजी सरपंच विठ्ठल घावटे ,बालाजी विश्वविद्यालयाचे प्राचार्य विनायक म्हसवडे ,बालाजी इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य गणेश मिटपल्लीवार, उपप्राचार्या प्रणिता शेळके, महेश बेंद्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप गावडे, पालक, शिक्षक समितीचे सदस्य व पालक उपस्थित होते. लॅब व आधुनिक काळात तंत्रज्ञानाचे महत्त्व याविषयी पालकांसाठी सत्र घेण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन माधुरी शिंदे, प्रियांका जाधव, अमृता मोढे, पल्लवी पंडित, सागर खणसे यांनी केले. सूत्रसंचालन मोनाली अनंतवार यांनी केले. हा सोहळा प्राचार्य गणेश मिटपल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
अध्यक्ष पवार यांच्याकडून नावीन्यता जपली
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिवराव पवार हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलमध्ये शिक्षण तसेच क्रीडा याबरोबर आधुनिक काळाची गरज ओळखून तंत्रज्ञान क्षेत्रातही विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी प्रशस्त रोबोटिक्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि कोडींग लॅबची स्थापन केली आहे. त्यानुसार अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे.