जिल्हाधिकार्यांच्या जेजुरीच्या प्रशासनाला सूचना
जेजुरी – जेजुरी नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे नियमबाह्य काम पाहणार्या व मनमानी करत नागरिकांना वेठीला धरणार्या त्या अधिकार्यांबाबत नगरपालिका प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्याकडे अभिप्रायसह सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे.
नागरिकांनी तक्रार केलेले नोडल अधिकारी निमशासकीय व कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत; मात्र मनमानी करून आरोग्य विभागातील कर्मचारी व नागरिकांना नाहक त्रास देत असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली होती.
संबंधित नोडल अधिकारी ह निमशासकीय व कंत्राटी पद्धतीने कार्यरत असताना त्यांना जेजुरी नगरपालिकेत स्वच्छता व आरोग्य विभागाचा प्रमुख पदभार कोणत्या तरतुदींच्या आधारे, कोणाच्या मान्यतेने दिला? याची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी. तसेच आरोग्य व स्वच्छतेच्या समस्या घेऊन येणार्या नागरिकांचो ते अडवणूक करतात या विभागातील ठेका पद्धतीने काम करणार्या कर्मचार्यांचे वेतन जाणीवपूर्वक अडवून त्यांना वेठीस धरतात.
महिला बचत गटांच्या कर्जवाटपात अनियमितता आहे, असे या तक्रार निवेदनात म्हटले होते .या तक्रारींची गंभीर दखल घेत खुलासा व अहवाल मागविला आहे. तसेच तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास मुख्याधिकारी व आरोग्य -स्वच्छताअभियंता यांना सर्वस्वी जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध नियमोचित शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे या पत्रामध्ये म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत चौकशी सुरू आहे. संबंधित वरिष्ठ पातळीवरून योग्य ती कारवाई होणार आहे.
– चारुदत्त इंगोले, मुख्याधिकारी