खाचरौद (मध्यप्रदेश) : ‘गुरु श्री सौभाग्य स्मृती’ पुरस्काराने जैन धर्म गुरूंच्या हस्ते अभय संचेती यांनी सन्मानित करण्यात आले.
मार्केट यार्ड – गो शाळेच्या माध्यमातून गायींची सेवा करणे, सामजिक, धार्मिक आणि व्यवसायिक कामाबद्दल ‘गुरु श्री सौभाग्य स्मृती’ पुरस्काराने मार्केट यार्डचे ज्येष्ठ व्यापारी अभय संचेती यांना सन्मानित करण्यात आले. जैन धर्म गुरू प.पू. प्रकाशमुनी म. सा यांच्या यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने मध्यप्रदेशातील खाचरौद येथे प.पू. प्रकाशमुनी म. सा यांच्या जन्म महोत्सवानिमित्त पुरस्काराचा कार्यक्रम झाला.
ओम गुरू आनंद गौशालेच्या माध्यमांतून २०१३ पासून ३५ गायींचे संगोपन करण्यात येत आहे. सेवाधर्म समजून मावडी (सासवड) परिसरात गो-शाळेची उभारणी केली आहे. तसेच, मागील ४० वर्षांपासून संचेती सामाजिक काम करत आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून आदर्श माता-पिता-पुत्र पुरस्कार, पाणपोई, महिला आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, करोना योद्धांचा सन्मान, पूरग्रस्तांना मदत असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या कामाची दखल घेऊन संचेती यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे आयोजक शैलेश बाफना, शांतीलाल चोरडिया हे होते. नंदकुमार चोरडिया, मनोहरलाल भटेवरा, पारस सिसोदिया, विजय नवलाखा, विजय भन्साळी, सागर सांकला यांची प्रमुख उपस्थिती होती.