मंचर : अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना उत्सव कार्यक्रम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नांदूर येथील ग्रामदैवत प्राचीन प्रभू श्रीराम मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थ नांदूर, विठ्ठलवाडी आणि टाकेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 22) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्रीराम देवस्थान समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
पहाटे 4 वाजता श्रीराम प्रभूंचा अभिषेक, 5 ते 7 काकडा भजन, 9 ते 10 श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. साडेदहा ते साडे बारा या वेळेत ह. भ. प दिनेश महाराज माने लातूरकर यांचा यांचे कीर्तन होणार आहे.
यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन श्रीराम उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. श्रीराम रक्षा स्रोत्र, हनुमान चालीसा याचे पठण श्री स्वामी सेवा केंद्र कळंब यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
भैरवनाथ संगीत भजन मंडळ महाळुंगे पडवळ व नारायणगाव यांचे भजन तसेच हरिपाठ, सत्संग विश्व हिंदू परिषद भीमाशंकर पुणे जिल्हा यांचे कार्यक्रम आणि रात्र 9 वाजता श्रीराम प्रभूंचा पालखी सोहळा मिरवणूक फटाक्यांच्या आतीषबाजीत होणार आहे.