पौड : माजी सरपंच विनायक गुजर यांच्या घरातून सात लाख 22 हजारांचे सोने व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे.
पौड गावातील जुन्या बाजारपेठेत विनायक गुजर यांचे घर आहे.
घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील लॉकरमधील सोने व चांदीच्या ऐवज चोरून मागील दरवाजातून चोरट्याने पळ काढला आहे.
चोराने सोन्याच्या अंगठ्या, गोफ, चेन, ब्रेसलेट, पोत, बदामाचे पान, चांदीचे ताम्हण, बांगड्या, गणपतीचा मुकुट, पैंजण, मनगटे, कानातील मोत्यांची व चांदीची कुड्या असे 11 तोळे सोने व 46 तोळे चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
याबाबत पौड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी तपास करीत आहेत.