30 ग्रामपंचायती, रिक्त जागांसाठी निवडणूक
मंचर – आंबेगाव तालुक्यात मुदत संपणाऱ्या 30 ग्रामपंचायतींसाठी, तसेच रिक्त जागांच्या 14 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असल्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी सांगितले.
या निवडणुकांसाठीची नोटीस आज (दि. 6) जाहीर झाली असून, उमेदवारी नामनिर्देशन पत्रे 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत दाखल करता येतील. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नामनिर्देशनपत्रांची 23 ऑक्टोबर रोजी छाननी होईल. यानंतर 25 ऑक्टोबरला 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल आणि त्याच दिवशी चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
5 नोव्हेंबर रोजी मतदान तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन 9 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे.
मुदत संपणाऱ्या 30 ग्रामपंचायती
लोणी, फलादे, कुशिरे बुद्रुक, कोलतावडे, कानसे, गोहे बुद्रुक, तळेकरवाडी, चांडोली खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पहाडदरा, पारगांव तर्फे अवसरी बुद्रुक, जारकरवाडी, चास, ठाकरवाडी, वाळुंजनगर, पाटण, टाव्हरेवाडी, चपटेवाडी, सुपेधर, फुलवडे, डिंभे बुद्रुक, टाकेवाडी, तांबडेमळा, पिंपरगणे, म्हाळुंगे तर्फे घोडा, मांदळेवाडी, नांदुर, बोरघर, जाधववाडी.
रिक्त जागा असलेल्या 14 ग्रामपंचायती
रिक्त जागांच्या 20 सदस्य पदासाठी ग्रामपंचायत पंचाळे बुद्रुक, आहुपे, चिखली, पोखरी, गोहे खुर्द, भागडी, असाणे, आंबेदरा, राजेवाडी, खडकवाडी, गंगापूर बुद्रुक, धोंडमाळ शिंदेवाडी, साल या 13 ग्रामपंचायती आहे, तर एक लोकनियुक्त सरपंच पदासाठी ग्रामपंचायत पोंदेंवाडी आहे.