कापूरहोळ: राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील कापूरहोळ (ता.भोर) येथील मटका अड्ड्यावर कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एक हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चंद्रकात गुरूलिंगअप्पा बिराजदार (वय ४२, सध्या रा. रॉयल वूड सोसायटम् बस स्टँडजवळ, सासवड. मूळ रा. शिवाजी चौक, उदगिर, ता. उदगिर, जि.लातूर) आणि बाळू गुलाब बोरकर (वय ७०, रा विठठलनगर, हरिश्चंद्री ता. भोर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगिले की, राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील कापूरहोळ येथील श्री दत्त हॉटेलच्या पाठीमागे पत्राशेडमध्ये अवैधरित्या मटका सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मटका अड्ड्यावर कारवाई करून २ कॅलक्यूलेटर, चिमणी पाखरू चित्राचा चार्ट, रोख रक्कम असा एकूण १०८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गुंडगे करीत आहेत.