नायब तहसीलदार बिजे : हंबीराव मोहिते विधी महाविद्यालयात मतदार नोंदणी
राजगुरूनगर – पुणे आणि मुंबई जिल्हा यांमध्ये मतदान नोंदणीमध्ये सर्वांत खालचा क्रमांक लागतो, अशी खंत नायब तहसीलदार आर. बी. बिजे यांनी व्यक्त केली.
राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाच्या रत्नाई महाविद्यालयात तहसील कार्यालय खेड, पंचायत समिती विभाग तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय, रत्नाई महाविद्यालय आणि कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मतदान नोंदणी कार्यशाळाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते,
त्यावेळी बिजे बोलत होते. खेडचे गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी जीवन कोकणे, दत्तात्रय गोसावी, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या निलिमा पाटील, रत्नाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, उपप्राचार्य डॉ. किशोर भागवत, मुख्याध्यापक संतोष वायकर ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. आडवळे सांस्कृतिक कला विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल रणखांबे, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. संजय गायकवाड, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करीत सर्वांनी उद्देशिकेचे शपथ घेतली. 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नवंमतदान नोंदणी कशी करायची याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून नोंदणी करून घेतली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल रणखांबे यांनी केले.