महंत नामदेवजी महाराज शास्त्री लवकरच श्रीक्षेत्र अळे येथे भेट देणार
बेल्हे – श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट वेद बोलाविलेला श्री रेडा समाधी मंदिर श्रीक्षेत्र आळे, संतवाडी, कोळवाडी या देवस्थानचा 2024 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा श्रीक्षेत्र भगवानगड येथील महंत नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या हस्ते पार पडले.
श्रीक्षेत्र भगवानगड येथे अंदाजे 25 कोटी रुपये खर्च करून श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचे संपूर्ण दगडी काम सुरू आहे.त्याच धर्तीवर आपल्याही देवस्थानच्या विनामंडपाचे दगडी काम करावायचे आहे. याबाबत करावायच्या सर्व कामाबाबत शास्त्री महाराजांनी मार्गदर्शन केले. महंत शास्त्री महाराज यांनी आपल्या देवस्थानच्या कामाचे कौतुक करून दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी महाराजांचा सन्मान देवस्थानच्या वतीने करण्यात आला. तसेच शास्त्री महाराजांनी लवकरच आपण श्री रेडा समाधी मंदिरास भेट देणार असल्याचे सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य प्रसन्न डोके, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीप निमसे, रवींद्र गुंजाळ, चारूदत्त साबळे, कान्हू पाटील कुर्हाडे, संतोष पाडेकर, अमोल भुजबळ, बाळासाहेब जाधव, पांडुरंग डावखर, सुनील जाधव, गणेश शेळके, दिनकर राहिंज, संजय खंडागळे, पप्पू डोंगरे, पवन डोके, गणेश गुंजाळ हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी आळे देवस्थानची सर्व माहिती कान्हू पाटील कुर्हाडे यांनी दिली तर पांडुरंग डावखर यांनी आभार मानले.