फलटण – बरड, ता. फलटण येथील मातोश्री मंगल कार्यालयातून नववधूचे दोन लाख रुपयांचे सोन्याचांदीच्या दागिन्यांवर विवाह लागण्याआधीच चोरट्याने डल्ला मारला. ही घटना रविवारी (दि. 17) घडली.
याप्रकरणी कैलास संभाजी ठणके (वय 42, रा. मुंजवडी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बरड येथील मातोश्री मंगल कार्यालयात कैलास ठणके यांच्या मुलीचा विवाह काल (दि. 17) दुपारी 1 वाजता झाला. हा विवाह लागण्यापूर्वीच नववधूचा पावणेतीन तोळ्यांचा राणीहार, कानातील टॉप्स, चांदीचा गणपती, चांदीचे ब्रेसलेट, चांदीचे पंचपाळे, असे एक लाख 82 हजार 208 रुपये किमतीच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. हवालदार चांगण तपास करत आहेत.