मंचर – शारदीय नवरात्रौत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. मंचर आणि घोडेगावसह अनेक गावात ढोल ताशाच्या गजरात व डीजेच्या तालावर देवीची सायंकाळी मिरवणूक काढत स्थापना करण्यात आली. या निमित्त महिलांनी घरोघरी घटस्थापना ही केली.
मंचर येथे देवीची मिरवणूक काढत स्थापना करण्यात आली. यावेळी महिला मुली नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर घोडेगाव, निरगुडसर, मेंगडेवाडी, पारगाव, पिंपळगाव,अवसरी, या गावातहि मोठ्या उत्साहात देवीची स्थापना करण्यात आली.
देवीची मंदिर असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर, कळंब, भराडी, पोंदेवाडी, पहाडदरा या गावांमध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली.
पुढील नऊ दिवस गावा गावात गरबा, दांडिया, होम मिनिस्टर, सांस्कृतिक कार्यक्रम, फनी गेम्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने लहान मुले, महिला मुली, तरूण वर्ग यामध्ये उत्साह संचारला आहे.