खडकवासला -राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी हवेली तालुक्याचा पश्चिम पट्ट्यात खेड शिवापूर परिसरातील गावांमध्ये विकास कामाचा पाहणी दौरा केला. विविध गावातील सरपंच व सदस्यांसोबत त्यांनी संवाद साधला.
याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रवीण शिंदे, अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक चोबे, दत्ता धनकवडे खडकवासला विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, युवक अध्यक्ष सागर कोल्हे, शशिकांत किवळे, जावेद खान, विशाल भालेराव, खेड शिवापूरचे सरपंच स्वप्निल जगताप, माजी उपसरपंच स्वप्निल कोंडे, सरपंच सतीश दिघे, प्रवीण धोंडे, उपसरपंच राजू सट्टे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश दिघे, शशिकांत दिघे, संतोष कोंडे तसेच भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
पार्थ पवार यांनी रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून विविध गावांमध्ये जाऊन विकास कामांची पाहणी करत विचारपूस केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सरपंच उपसरपंच व सदस्यांसोबत अडचणी असतील तर त्या मांडण्यास सांगितल्या. पार्थ पवार म्हणाले मी कायम आपल्या सोबत आहे. विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही याची हमी देतो. असे शिवापूरचे सरपंच अण्णा दिघे यांनी सांगितले.