Supriya Sule wealth | बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडे स्थावर व जंगम अशी एकूण 47 कोटी 21 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर पती सदानंद सुळे यांच्या नावावर 119 कोटी 30 लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांना 55 लाख रुपयांचे दायित्व आहे. सुळे यांनी पार्थ पवार यांच्याकडून 20 लाख, तर सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रुपये घेतले असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडून ही रक्कम घेतली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतही सुळे यांनी या दायित्वाचा उल्लेख केला होता, तर 2019 मध्ये सुळे कुटुंबीयांची एकूण संपत्ती 139 कोटी होती. त्यामध्ये वाढ होऊन आता एकूण मालमत्ता 166 कोटी इतकी झाली आहे. विशेष बाब म्हणजे एवढी संपत्ती असून सुळे यांच्या नावावर एकही वाहन नसल्याचे यामध्ये नमूद केले आहे, तर बँकेचे कुठलेही कर्ज नसलेल्या सुळे यांनी तीन कोटी ५८ लाख ७७ हजार २३० रुपये विदेशी बँकांमध्ये गुंतवले आहेत. सुळे यांचे पती सदानंद यांनी सुमारे सहा कोटी ५५ लाख १६ हजार ६७३ रुपये विदेशी बँकांमध्ये गुंतवले आहेत.
मालमत्तेचा तपशील Supriya Sule wealth |
– सुप्रिया सुळे यांचे वार्षिक उत्पन्न – 3 कोटी 90 लाख
– व्यवसाय – शेती व व्यवसाय
– जंगम मालमत्ता – 152 कोटी 81 लाख 57 हजार
(मुदत ठेवी, शेअर्स, सोने, बचत योजना)
– सुळे कुटुंबीयांकडे सुमारे चार किलो 100 ग्रॅम सोने, 41 किलो चांदी, 1793 कॅरेटचे हिरे आहेत
स्थावर मालमत्ता – 13 कोटी 81 लाख 57 हजार रुपये
(माळेगाव, ढेकळवाडी सुमारे सहा हेक्टर जमीन, कोरेगाव पार्क, मोदीबाग येथे सदनिका
– दायित्व – 55 लाख
-शिक्षण – बी.एस्सी