दुर्घटना टळली,जिवितहानी नाही.
सविंदणे : (अरुणकुमार मोटे ) दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास सरावादरम्यान विमानाचा ६०-७० फूट लांबीचा पाइप सदृश मेटल पार्ट कवठे गावाच्या हद्दीत गांजेवाडी या परिसरात पडला होता.
फाकटे, गांजेवाडी परीसरात हा पार्ट शोधून काढण्यासाठी काल पासून शोध मोहीम सुरू केली होती. रात्र झाल्याने व परीसरात बिबट्या आढळल्याने ही शोध मोहीम थांबवण्यात आली होती. पुन्हा ( दि. १८ )रोजी पहाटे सकाळी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले , पोलिस स्टाफ व एअरफोर्स टीम ची शोध मोहीम सुरू झाली,
शोध मोहीम सुरू केली असता हा पार्ट कवठे गावाच्या हद्दीत गांजेवाडी सापडला आहे . या कामी पोलिस पाटील व कवठे, गांजेवाडी, फाकटे परीसरातील ग्रामस्थांनी शोध घेण्यास मदत केली आहे.
हा पार्ट६०-७० फुट लांबीचा असून निर्जन ठिकाणी पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हा पार्ट पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.