पुणे – राज्यातील अकृषी विद्यापीठे, तंत्रशिक्षण विद्यापीठ, संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी नव्याने विद्यार्थी जीवन आणि अपघात विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी दोन लाखांपासून ते पाच लाखांपर्यंत विमा योजना आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेत विद्यार्थ्यासोबतच त्याच्या पालकांपैकी एका व्यक्तीलाही हे संरक्षण मिळणार आहे. ही विमा योजना विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरुपात असणार आहे.
उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली विमा योजनांसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या शिफारसींनुसार विद्यार्थी विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयआरडीए परवानाधारक विमा कंपनी निवडण्यात आली. विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा आणि विद्यार्थी वैयक्तिक विमा योजनेसाठी आयसीआयसीआय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. निर्णय घेतला आहे.
नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून अपघात विमा योजनेतील पाच लाखांच्या विमा संरक्षणासाठी 62 रुपये भरावे लागणार आहेत. आयसीआयसीआय लोम्बार्डच्या एक लाख रुपयांच्या अपघात विम्यासाठी 20 रुपये, तर दोन लाख रुपयांच्या अपघात विम्यासाठी 422 रुपये भरावे लागतील. विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांनी संबंधित कंपन्यांतून निवड करून या योजना विद्यार्थ्यांसाठी लागू कराव्यात. संबंधित विमा कंपन्यांचे विमा संरक्षण दर तीन वर्षांसाठी स्थिर असेल, असेही उच्च शिक्षण विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, तीनही योजनांपैकी योग्य वाटत असलेल्या विम्याची निवड करून ऐच्छिक स्वरुपात विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा विद्यार्थ्यांसाठी लागू करावी. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना उच्च शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांना दिल्या आहेत. या योजने संदर्भात काही तक्रारी, आक्षेप अथवा मार्गदर्शक उच्च शिक्षण संचालकांना समन्वय अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना द्यावे लागणारे रुपये विम्याची रक्कम
20 एक लाखाचा विमा
62 पाच लाखांचा विमा
422 दोन लाखाचा विमा