बारामती – भाजपचे नेते नवनाथ पडळकर यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी प्रवक्तेपदी निवड झाली. या निमित्ताने माहिती अधिकार कार्यकर्ते पोपटराव धावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नवनाथ पडळकर यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपमधील वैचारिक व अभ्यासू नेतृत्व म्हणून पडळकर यांच्याकडे पाहिले जाते. सत्कार समारंभास अॅड. जी. बी. गावडे, संपतराव टाकले, अॅड. गोविंदराव देवकाते, वसंत घुले, संदीप चोपडे, संजय गावडे, बापूसाहेब थिटे, राजेश कांबळे, सुहास टकले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना नवनाथ पडळकर म्हणाले की, मला मिळालेली ही जबाबदारी समाजाच्या कामासाठी आणि उन्नतीसाठी मी पणास लावेल. निश्चितपणे धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन देवेंद्र बनकर यांनी तर सतीश गावडे यांनी आभार मानले.