ग्रामपंच्यातीवर भगवा फडकवल्याने आढळरावांनी केले अभिनंदन
चिंबळी – महानगाव निघोजे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे केला.
नुकत्याच झालेल्या पंचवार्षिकमध्ये निवडणूक आलेले सरपंच सुनीता कैलास येळवंडे, उपसरपंच प्रियंका बाळासाहेब आल्हाट यांच्यासह सदस्यांनी आढळराव पाटील यांची लांडेवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी नवनिर्वाचितांचा सन्मान केला. तसेच निघोजे ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शीलाताई शिंदे उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, युवा जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, युवा सेना विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख कुलदीप येळवंडे, युवा तालुकाप्रमुख विशाल पोतले, उपतालुकाप्रमुख संदीप येळवंडे, राहुल थोरवे, अण्णासाहेब घेणंद,
माजी उपसरपंच हिरामण येळवंडे, रामदास शिंदे, तुकाराम आल्हाट, शाखाप्रमुख वैभव बेंडाले, चंद्रकांत बेंडाले, साहेबराव येळवंडे, धनंजय फडके, प्रसिद्ध फायनल सम्राट बापूसाहेब आल्हाट, रोहिदास येळवंडे, ओम शिंदे, अमोल बेंडाले आदी उपस्थित होते.