पिरंगुट : भूगाव (ता. मुळशी) येथे झालेल्या फुल पीच टेनिस क्रिकेट स्पर्धेत उरवडेचा नवखंडेनाथ क्रिकेट क्लब भूगाव करंडकाचा मानकरी ठरला. तर कासारसाईच्या मुळशी सम्राट क्रिकेट क्लबला उपविजेतेपद मिळाले. उरवडे संघाला रोख 1 लाख रुपये, चषक तर उपविजेत्या कासारसाई संघाला रोख 75 हजार रुपये व चषक देण्यात आला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
भूगाव क्रिकेट क्लब, भूगाव ग्रामस्थ व मातळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भूगाव करंडक 2024 ही स्पर्धा पार पडली. मुळशी तालुक्यातील एकूण 25 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात उरवडे संघाने कासारसाई संघाला नमवत विजेतेपद मिळवले. उरवडे संघाचा ऋषिकेश भिलारे अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. तृतीय क्रमांक सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हाडशी, चतुर्थ क्रमांक गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे तर पाचवा क्रमांक पिरंगुट क्रिकेट क्लबने मिळवला. त्यांना अनुक्रमे पन्नास हजार, तीस हजार, पंचवीस हजार व चषक देण्यात आला.
स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणारा कासारसाई संघाचा अक्षय शितोळे स्पर्धेचा मानकरी ठरला. तर उरवडे संघाचा ऋषिकेश भिलारेने उत्कृष्ट फलंदाज तर कासारसाई संघाचा अथर्व बोडकेने उत्कृष्ट गोलंदाज किताब मिळवला. त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शंकर मांडेकर, महादेव कोंढरे, बाळासाहेब सणस, वैशाली सणस, दीपक करंजावणे, राजाभाऊ वाघ, अलका ववले, सुरेखा शेडगे, दिनेश सुर्वे, कालिदास शेडगे, अनिल पवार, शिवाजी तांगडे,
राहुल शेडगे, स्वास्तिक चोंधे, मयुरी आमले, वनिता तांगडे, सुनीता चोंधे, नारायण करंजावणे, नितीन चोंधे, विजय सातपुते, विशाल भिलारे, मनोहर सणस, अजित इंगवले, कुलदीप शेडगे, अक्षय सातपुते, सतीश इंगवले, बाळासाहेब शेडगे, नारायण शेडगे, अंकुश मिरगे, ज्ञानेश्वर गावडे, लालचंद्र भिलार, कैलास चोंधे, अनिकेत शेडगे, अनिल चोंधे, अमित घारे, नवनाथ घारे, विशाल सुर्वे, जितेंद्र इंगवले, निवृत्ती शेडगे, जीवन कांबळे, वसंत सणस, नरेश चोंधे, नामदेव सांगळे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.