इंदापूर – इंदापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात नृसिंह जयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दररोज नृसिंह पवमान पंचामृत महापूजा, भजन, भरनाट्यम, प्रवचन, सुगम भक्ती संगीत, बासरी वादन, भक्तीगीत, अभंग यात्रा, मुक्ताई एक आविष्कार, नामवंत कलाकारांच्या वतीने भक्तीसंगीताचे कार्यक्रम पार पडले.
नृसिंह जयंतीचे जन्मकाळाचे कीर्तन विलास गरवारे यांनी केले. जन्मकाळ सायंकळी 6. 51 वाजता साजरा करण्यात आला. यावेळी राज्यभरातून हजारो भाविक उपस्थित होते. लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने दररोज अन्नदान सर्व भाविकांना देण्यात आले. या वर्षी संपूर्ण मंदिर फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले होते.
श्री नृसिंहांची महापुजा लक्ष्मी नृसिंह देवस्थानचे मुख्यविश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे यांनी केली. सुवर्ण अंलकार महापूजा करण्यात आली. या वर्षी धाराशिव उस्मानाबाद येथील जे. एफ. अजमेरा रोटरी नेत्ररुग्णालय व देवस्थान यांचे वतीने नेत्र व दंत मोफत तपासणी शिबीर झाले. डोळे तपासणी 120 व दंत 100 गरजू गरीब तपासणी झाली. शुक्रवारी (दि. 5) श्रींची पालखी व छबीना मिरवणूक दारूकाम, विद्युत रोषणाई होणार आहे.
शनिवारी भव्य कुस्ती आखाडा भरणार आहे.शनिवारी काल्याची कीर्तन सेवा अंकुश रणखांबे महाराज करणार आहेत. लक्ष्मी नृसिंह देवस्थान मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे, विश्वस्त अभय वांकर पाटील, विश्वस्त डॉ. प्रशांत सुरू, विश्वस्त प्रमोद दंडवते, पुजारी मंडळ, संरपच, उपसरपंच यात्राकमीटी, ग्रामस्थ यांनी नृसिंह जयंती उत्सव पार पाडण्यासाठी सहकार्य व परिश्रम घेतले. श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) : येथील श्री नृसिंहांची महापूजा देवस्थानचे मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे यांनी केली.