राजुरी: नगर- कल्याण महामार्गावर दुचाकीच्या खाली दबा धरून बसलेल्या एका बिबट्याला अनेक नागरिकांनी पाहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंतर व नागरिकांच्या गोंगाटामुळे बिबट्याने तेथून पळ काढला.
राजुरी (ता. जुन्नर) येथील उपळीमळा शिवारात काल रात्री8वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या दुचाकी खाली दबा धरून बसला होता. बिबट्याला रस्त्याने येणार्या जाणार्या नागरिकांनी पाहिले.
दुचाकी खाली असणार्या बिबट्या अंगावर धावून येतो का काय अशी भीती होती. बिबट्या मात्र दुचाकीखाली शांत बसून होता. कोणावरही धावला नाही की गुरगुरला सुद्धा नाही.
काही नागरिकांनी धाडसाने बिबट्याच्या जवळ जाऊन फोटो काढण्याचे हौस भागवली. मात्र अर्ध्या तासानंतर बिबट्या स्वतः उठून रस्त्याच्या पलीकडे उसाच्या शेतात निघून गेला.