खासदार सुळे : रोहित पवारांवरील नोटीसीनंतर प्रतिक्रिया
सासवड – सरकारच्या विरोधात बोललं की इन्कम टॅक्स, इडी आणि सीबीआय दिसतं, हे माध्यमे बोलतात. 95 टक्के विरोधकांना ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स लावले जाते, असा उल्ट घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
सासवड प्रसारमाध्यमांशी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. रोहित पवार यांच्या ईडी समन्सावर सुळे म्हणाल्या, मला आश्चर्य वाटत नाही. कारण वाॅशिंग मशीन मध्ये गेला की काय प्रॉब्लेम नाही. सगळ्यात चांगले उदाहरण म्हणजे समरजित घाटगे. भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले त्यांच्यावर ईडी घरापर्यंत गेली;
परंतु आणि मुश्रीफ भाभी यांचे मनापासून कौतुक करते त्या ईडीशी लढल्या आणि जोपर्यंत नातवंडांना दूध मिळत नाही, तोपर्यंत ईडीला घरात घुसून देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर मुश्रीफ हे भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष झाले आणि तेच कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत.
भारतीय जनता पक्षाने मुश्रीफ यांच्यावर केलेल आरोप खरे का खोटे होते याचे उत्तर द्यावे. पक्ष फोडण्यासाठी आणि घरे फोडण्यासाठी एजन्सीचा वापर होतोय. एजन्सी वाल्यांची चूक नाही. मुख्यमंत्री म्हणतात राज्य अदृश्य शक्ती चालवते. अदृश्य शक्ती ही महाराष्ट्र माणसाच्या विरोधात कटकारस्थान करीत आहे.
अंगणवाडी भगिनींसाठी पैसे नाहीत
अंगणवाडी भगिनींना अनेक वेळा मी भेटायला गेले होते. महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे व काँग्रेस पक्षही गेला होता. या अंगणवाडी कर्मचारी एकल महिला आहेत. यांच्याकडे दाऊसला जाऊन 35 कोटी रुपये उधळपट्टी करायला आहेत;
पण आमच्या या कष्ट करणाऱ्या अंगणवाडी भगिनींसाठी पगारवाढ करायला पैसे नाहीती, हे दुर्दैव आहे. अशाच स्वार्थी आणि संवेदनहीन सरकारचा मी जाहीर निषेध करते.