नगर – मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यभरात २३ जानेवारीपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नगर शहरात सर्वे क्षणासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक पंकज जावळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगणक व पर्यवेक्षक अशा ९०१ कर्मचान्यांमार्फत सर्वे क्षण होणार आहे. त्यासाठी या सर्वांना २१ व २२ जानेवारी रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नगर शहरात सुमारे सव्वा लाख मालमत्ता असून सुमारे एक लाख कुटुंब आहेत. जनगणनेच्या प्रगणक गटांनुसार सर्वेक्षणासाठी ७५२ प्रगणक व ६४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, तीनही उपायुक्तांची सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रगणक गटांच्या नकाशानुसार नगररचना विभागाकडून नकाशे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पुण्याच्या गोखले संस्थेकडून २१ व २२ रोजी माहिती कशी संकलित करायची, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दरम्यान, ७५ प्रगणक वन १० पर्यवेक्षक राखीव ठेवले आहेत. एकूण ९०१ कर्मचान्यांमध्ये ३९० मनपा कर्मचारी असून, उर्वरित मनपा व खासगी शाळांचे शिक्षक नियुक्त करण्यात आले आहे. प्रगणकांना प्रत्येकी दहा ना हजार व पर्यवेक्षकांना पगाराच्या निम्मा खर्च देण्यात येणार आहे. नगर शहरातील संपूर्ण सर्वे नो क्षणासाठी १.१० कोटींचा खर्च अपेक्षित असून, तशी मागणी मनपाकडून शासनाकडे करण्यात आली आहे.