पुणे -जिल्ह्यातील वाढता करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी झटणाऱ्या आरोग्य विभागाचा कर्मचारी करोना पॉझिटिव्ह सापडला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य प्रमुखासह संपूर्ण आरोग्य विभाग क्वारंटाइन करण्यात आला आहे. दरम्यान, “येथे निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता करण्यात आली असून, सर्व उपाय आम्ही करत आहोत,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
आरोग्य विभागात सापडलेला बाधित कर्मचारी आतापर्यंत कार्यालयात काम करत होता. त्यामुळे विभागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण सुरू केले आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांपासून सर्व कर्मचाऱ्यांची उद्या तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्याटप्यात अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही तपासणी करणार आहोत.
– प्रमोद काकडे, सभापती, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद