मंचर – आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये रयतचे संस्थापक पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले.
याप्रसंगी भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, संजय बाणखेले, प्राचार्य उत्तम आवारी, आशिष पुंगलिया, परशुराम भेके, मुख्याध्यापिका योमुनिसा शेतसनदी, उपमुख्याध्यापक माधव कानडे, साहेबराव काळे, यादव चासकर, लक्ष्मण रोडे, संदीप कोल्हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन दिलीप चौधरी, किशोर जगताप, केशव टेमकर, धिरज कोळेकर, स्वाती उपार, उज्ज्वला बाणखेले, मुर्तुजा मोमीन, उज्ज्वला हुले, सुवर्णा गोसावी, प्राची चौधरी, सोनाली सोनवणे, अनिता चव्हाण, विशाल गाडे, दत्तात्रय चासकर, संतोष मुंढे, मयुरी क्षीरसागर, दुर्गा चौधरी यांनी केले.