महादेव कोंढरे ः खासदार निलंबनाच्या निषेधार्थ मुळशीत आंदोलन
पौड – 2009 सालापासून खासदार सुप्रिया सुळे याभागाचे प्रतिनिधित्व करत असून महासंसदरत्न म्हणून त्यांची ख्याती आहे. सलग आठ वर्षे त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे.
जे खासदार संसदेत आवाज उठवतात, त्यांचा आवाज बंद करण्याचे काम हे सरकार करत आहे. लोकशाही नष्ट करून हे सरकार या देशात हुकूमशाही राबवत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केला आहे.
लोकसभेतून खासदार सुप्रिया सुळे व इतर खासदार यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या निषेधार्थ महादेव कोंढरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयाबाहेर निषेध करण्यात आला.
त्यावेळी महादेव कोंढरे बोलत होते. याबाबतचे निवेदन नायब तहसिलदार श्रीकांत मिसाळ यांना देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, बाजार समितीचे उपाध्यक्ष दगडूकाका करंजावणे, माजी सभापती कोमल वाशिवले, उज्वला पिंगळे, महिला अध्यक्षा दीपाली कोकरे,
युवक अध्यक्ष सागर साखरे, भोर विधानसभा युवक कार्याध्यक्ष प्रशांत रानवडे, युवक कार्याध्यक्ष राहूल पवळे, उपाध्यक्ष बाबाजी शेळके, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष भाऊ केदारी, माजी उपसरपंच महादेव गोळे, सुभाष माझिरे आदी मान्यवर पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.