माळेगाव पोलिसांची कारवाई ; सव्वा लाखांची दारू नष्ट..
डोर्लेवाडी : घाडगेवाडी (ता. बारामती) येथे नीरा नदीच्या काठी बेकायदेशीरपणे सुरू असलेली गावठी दारूची भट्टी माळेगाव पोलिसांनी उद्ध्वस्त केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विकास शिवाजी राखुंडे यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी संदीप शामराव भोसले (वय२६), रा.निरावागज, ता. बारामती), संतोष दणाने (मूळ रा. कराड विमानतळ), पांडुरंग भोसले (रा. शिंदेवस्ती घाडगेवाडी, ता. बारामती), ओंकार उर्फ भैय्या आडके (रा. सांगवी, ता. बारामती), बाळू नंदू बागाव (रा.शिरवली, ता. बारामती) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
मंगळवार (दि.२६) सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घाडगेवाडी हद्दीतील नदीच्या कडेला गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी ही कारवाई करण्यात आली. एकूण १ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी साठवलेले कच्चे रसायन व इतर साधने तसेच दारु पंचासमक्ष जागीच नष्ट करण्यात आली.
कारवाईदरम्यान आरोपी संदीप भोसले, संतोष दणाने यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीसांची चाहूल लागल्याने आरोपी पांडुरंग भोसले हा पळून गेला