सातारा – जिल्हा रुग्णालयांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्यावतीने (एनटीपीसी) ‘कोटपा’ कायद्यानुसार वडूज येथील 14 टपर्यांवर कारवाई करण्यात आली. टपरीचालकांकडून सात हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई, व्यापार, वाणिज्य उत्पादन आणि नियमन) कायदा 2003 म्हणजे ‘कोटपा’ कायद्याची अंमलबजावणी आणि संनियंत्रणासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांची समिती कार्यरत आहे.
या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी, तंबाखूची जाहिरात आदींवर निर्बंध आहेत. तंबाखू विक्री करणार्या टपरीचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, एनटीपीसीच्या जिल्हा सल्लागार डॉ. दिव्या परदेशी, मानसशास्त्रज्ञ दीपाली जगताप, पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज कर्पे यांनी दिली.